विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बेळगावातील मराठी बहुल अशा तीन मतदार संघावर महिलाराज आले आहे.बेळगाव ग्रामीण आणि खानापूर मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच महिला आमदार होण्याचा मान काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांना मिळालाय.निपाणी तुन भाजप तर्फे सलग दुसऱ्यांदा शशिकला जोल्ले या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
महिलांना प्रत्येक क्षेत्रांत संधी मिळायला हवी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया शिकल्या आणि आता लोकप्रतिनिधीही होऊ लागल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे.
महिलांनी प्रशासन चालवताना मात्र त्यांच्यावर पुरुषांचे वर्चस्व असते असा आरोप नेहमी होत असतो, या तीन महिला स्वतंत्रपणे काम करून हे असले आरोप खोडून काढतात का हे पाहावे लागेल.