?मेष-हा सप्ताह आपणास मध्यम फल दायी राहील कामातील अडथळे दूर होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.वास्तू संबंधी किंवा प्रॉपर्टी संबंधित कामे होतील.प्रकुर्तीची तक्रार जाणवेल. प्रवासात त्रास होण्याचा संभव आहे. त्यामुळे याआठवड्यात प्रवास टाळावा.जोडीदाराची साथ लाभेल.
?वृषभ-हा सप्ताह आपणास थोडा त्रासाचा असेल.घरात काही कारणाने वादाचे प्रसंग निर्माण होतील.वैवाहिक जोडीदारा बरोबर वाद होण्याचा संभव आहे तेव्हा आपण शांत राहिल्यास ते टाळता येईल.कामा निमित्त प्रवास होतील.महिलांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.जे नोकरी शोधत असतील तर नोकरी चे योग येतील.मुलांना सहलीचा आनंद घेता येईल.
?मिथुन-हा सप्ताह आपणास आनंददायी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.मुलां कडून एखादी चांगली बातमी मिळेल. परंतु नोकरीत असणार्या ना वरिष्ठ अधिकारी बरोबर काही वाद होतील.त्यामुळे या काळात नोकरदार वर्गाने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.तसेच या काळात घरात पाहुण्यांचे आगमन होईल.तसेच खर्च पण वाढतील त्यामुळे महिना अखेर आर्थिक वेळापत्रक कोलमडले जाणार नाही याची काळजी घ्या.
?कर्क-हा सप्ताह आपणास मध्यम असा राहील.कोर्टकचेरी कामात यश मिळेल.तसेच विवाहीताना संतती सुखाचा आनंद मिळेल.धार्मिक कार्यात भाग घ्याल.त्यातून मानसिक समाधान मिळेल.व्यापारीवर्गातील लोकांना व्यापारात आर्थिक फायदा होईल.पैशा संबंधित व्यवहार जुंपून करावे उसने पैसे देतांना जपून.महिलांना कुटूंबिक सुखाचा आनंद मिळेल.
?सिंह-हा सप्ताह आपणास थोडा त्रासाचा राहील.हातीघेतलेल्या कामात अडथळा निर्माण होईल.त्यामुळे तुम्ही चिंता कराल.हा सप्ताह नंतर कामाला वेळ लागला आहे.या काळात आपण मन प्रसन्न ठेवण्यासाठी पूजापाठ किंवा जप केल्यास मन शांत आणि प्रसन्न राहील.व्यापरिवर्गाला या काळात नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या काळात आपण संततीची काळजी घ्यावी.गर्भवती महिलांनी या काळात तब्येतिची काळजी घ्यावी.नोकरीत असणार्या ना वरिष्टाचा सहयोग मिळेल.
?कन्या-हा सप्ताह आपणास चांगला राहील.हातीघेतलेल्या कामात यश मिळेल. तसेच काही तरी नविनकारण्याची संधी मिळेल.राजकारणात असनर्यांनी पुढे करणाऱ्या कामाचे नियोजन आता केल्यास त्याचाफायदा आपणास नक्की होईल.मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल.कामाच्या धावपळीत प्रकुर्ती बिघडेल.याकाळात मात्र आपण जमीन घर या संबंधी व्यवहार अयशस्वी होतील. त्यासाठी थोडा काळ जाऊद्या.मुलांना सुट्टीचा आनंद घेता येईल.
?तुला- या काळात आपण केलेल्या एका चुकी मुळे आपणांस त्रास होईल. या काळात आपण रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.नोकरिव्यवसायात असणाऱ्याना कामा निमित्त प्रवास होईल.या काळात कर्ज प्रकरणे केल्यास अयशस्वी होतील.या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.महिलांना या काळात घरातील वयस्कर मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.खर्चावर नियंत्रण राहणार नाही.
?वृश्चिक-या सप्ताहात आपण काही तरी नवीन गोष्टी कराल.मित्रांचे सहकार्य लाभले. त्यामुळे फायदा होईल.घरात एखादे धार्मिक कार्य घडेल.या काळात मुलां कडून काही चांगली बातमी मिळेल.उष्णतेचे त्रास होतील. सामाजिक संस्था काम करणाऱ्या मान सन्मान मिळेल.व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील.
?धनु-हा सप्ताह आपणास समाधान देणारा राहील.शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बढती किंवा बदलीचे योग आहेत.या काळात आपणास केलेला प्रवास फायदेशीर होईल.नोकरीत असनर्यांनी संयमाने वागावे अन्यथा अपमानाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.कोर्टकचेरी कामात यश दायी सप्ताह.विवाहयोग्य तरुण तरुणीचे विवाह जुळण्याचे योग येतील.वाहन जुंपून चालवावे.गुडघे पाठी संबंधित त्रास होतील.मुलांना नवनवीन शिकण्याची संधी मिळेल.
?मकर-या सप्ताहात आपल्याला आपण केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल.व्यापारात एखादे आर्थिक नुकसान होऊ शकते. या काळात कुठलीही नवीन गुंतवणूक नुकसान देईल. या काळात घरगुती खर्च वाढतील.या काळात आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.उष्णतेमुळे डोळ्यास त्रास होईल.नोकरीत असणार्या ना वरिष्टाशी वादाचे प्रसंग येतील.मुलांना मना प्रमाणे यश मिळेल.एखादे जुने मित्र भेटतील त्यामुळे मन प्रसन्न होईल.
? कुंभ-संततीविषयक आर्थिक समस्या त्रास देतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये नवीन संधी चालून येतील. जोडीदारा संदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून अडचणी निर्माण होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल.
? मीन-उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीविषयक शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणे कठीण आहे. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. वैयक्तिक दृष्टीने शुभ घटना घडतील. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल.
?जोतिष?
उषा सुभेदार
कोरे गल्ली, शहापूर,
बेळगाव
8762655792