बेळगाव उत्तर मतदारसंघात म ए समिती च्या वतीने निवडणूक लढवत असलेले बाळासाहेब काकतकर हे सुद्धा निवडून येण्याच्या पायरीवर आहेत . त्यांना आमदार संभाजी पाटील यांचे बळ मिळाले आहे. बाळासाहेब यांची धास्ती आता उत्तर मधील राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना लागली असून ते मुसंडी मारून पुढे जातील असा विश्वास निर्माण झाला आहे.
उत्तर मतदारसंघात बाळासाहेब आणि संभाजीराव पाटील असे दोन उमेदवार उभे होते. संभाजीराव यांनी मोठे मन दाखवून आपली माघार जाहीर केल्याने बाळासाहेबांचे मनोबल आता वाढले आहे.
वाघ आता बाळासाहेब काकतकर यांच्या प्रचारासाठी फिरणार आहे. यामुळे विरोधक नामोहरम होण्यास वेळ होणार नाही.असे वातावरण निर्माण झाले आहे.
बाळासाहेब काकतकर हे दिवंगत शिवाजीराव काकतकर यांचे चिरंजीव आहेत आणि शहर म ए समिती अध्यक्ष किरण ठाकूर यांचे अनुयायी आहेत. सर्व मराठी नगरसेवक, मराठा समाज, नाराज मुस्लिम आणि लिंगायत त्यांची शक्ती वाढवत आहेत.
बाळासाहेब हे सर्वसमावेशक आणि मनमिळाऊ व्यक्ती असून त्यांचा संपर्क दांडगा आहे. याचाच फायदा ते समितीला करून देणार आहेत.
Trending Now