बेळगाव परिसरात चार मतदारसंघ समिती च्या उमेद्वारामुळे गाजत आहेत. यापैकी उत्तर मतदारसंघात बाळासाहेब काकतकर हे एकमेव समिती उमेदवार रिंगणात आहेत तर इतर तीन ठिकाणी दोन दोन उमेदवार आहेत, पण एकि करा हा सूर आता मावळला असून त्यापेक्षा त्या त्या ठिकाणी समितीचेच प्रबळ उमेदवार पाहून मतदान करण्याची भावना वाढली आहे.
बेळगाव दक्षिण मध्ये किरण सायनाक, उत्तर मध्ये बाळासाहेब काकतकर, खानापूर मध्ये विलास बेळगावकर हे प्रबळ आणि निवडून येऊ शकणारे उमेदवार आहेत, असा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे, वेळ फार कमी असल्याने आता याच उमेदवारांच्या मागे राहण्याचा निर्णय समिती नेते, कार्यकर्ते आणि गल्ली गल्लीतील पंच मंडळी घेत आहेत.
एकंदर प्रचाराचा धडाका पाहिला असताना सायनाक, काकतकर व बेळगावकर यांना मिळत असणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना धडकी बसत आहे.
खानापूर मतदारसंघात तर विलास बेळगावकर पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आले आहेत. बेळगाव दक्षिण मध्ये सायनाक यांची हवा आहे.राष्ट्रीय पक्ष जितके एकमेकात मतविभाजन करतील तितका त्यांचा फायदा होणार आहे. उत्तर मध्येही दोन राष्ट्रीय पक्षांच्या भांडणात तिसऱ्या चा म्हणजेच समितीचे बाळासाहेब काकतकर यांचा फायदा होणार आहे.
बेळगाव ग्रामीण मध्ये चित्र पालटण्यासाठी उमेदवार घट्ट होणे गरजेचे आहे. खासदारकीच्या निवडणुकीत झालेल्या अर्थ व्यवहाराचा फटका या मतदार संघात बसण्याचा धोका मोठा आहे.
एकि करून या म्हणून झाले, आता समितीतल्याच प्रबळ उमेदवारांना मतदान करा हा संदेश फिरू लागला आहे.