चव्हाट गल्ली, शिवाजी नगर भागात काही राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला म्हणजे पूर्ण उत्तर मतदार संघ विरोधी झाला असे मुळीच होणार नाही मराठी अस्मितेसाठी,सुप्रीम कोर्टातील याचिकेसाठी माझं मत समितीलाच ही भावना जागृत होऊन कामत गल्ली,माळी गल्ली भागात समितीचे उमेदवार बाळासाहेब काकतकर यांच जल्लोषी स्वागत करण्यात आलं.
फटाक्यांची आतषबाजी करत या भागात प्रचार फेरी काढण्यात आली बेळगावं कारवार निपाणी बिदर भालकीचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. कामत गल्ली,माळी गल्ली,टेंगीनकेरा गल्ली आदी भागात फेरी काढण्यात आली.आमदार संभाजी पाटील यांनी उत्तर मधून माघार घेऊन काकतकर यांना पाठिंबा जाहीर करताच समितीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाची भावना तयार झाली आहे.कामत गल्ली सारखा समितीचा बालेकिल्ला अभेद्य आहे.
मागील वेळी असलेल्या महिला उमेदवार रेणू किल्लेकर यांनी यावेळेस स्वतःला प्रचारात वाहून घेतले आहे याशिवाय मराठी युवा मंच चे नारायण किटवाडकर,अजित कोंकणे,माजी नगरसेवक बसवंत हलगेकर,आदींनी स्वतःला उत्तर मतदारसंघात प्रचारात झोकून दिले आहे.कामत गल्ली माळी गल्ली पंच मंडळी,संजय कडोलकर,मेघन लंगरकांडे आदींनी यावेळी पाठिंबा जाहीर केला.