बेळगावच्या मातीत पहिल्यांदाच पाय रोवून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भगवा फेटा परिधान केला. काँग्रेस बिजेपीला विसरा आणि जेडीएस ला मत घाला असा नारा त्यांनी दिला.
मी अनेक दिवसांपासून बेळगावला यायचा विचार करीत होतो, पण कर्नाटक काँग्रेस सरकार यामद्ये काडी घालत प्रयत्न करीत होतं त्यामुळे हे शक्य होत नव्हतं. टेम्पररी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मला बेळगावला येण्यापासून रोखत होते पण मी आता बेळगावला येतच राहणारअसे ते म्हणाले.
मला आता रोखणे काँग्रेसला शक्य होणार नाही.राहुल गांधी म्हणत होते संसदेत १५ मिनिट बोलायला संधी द्या, आता त्याच राहुल गांधींना मी विचारतो की मला बेळगावला येण्यास का रोखत होता.
मोदी आणि राहुल गांधी यांनी माझ्याबरोबर खुल्या चर्चेला यावं, फक्त ५ मिनिटे चर्चा करा. असे खुले आव्हान मी देतो.
असदुद्दीन ओवेसी कर्नाटकात मत विभाजन करायला आले आहेत असे लोक म्हणत आहेत. मुस्लिम, दलित आणि खालच्या वर्गाच्या राजकीय सुदृधिकरणात काँग्रेस आणि भाजपचं बाधा घालत आहेत.
मी कोणत्याही जाती धर्माच्या बाजूने नाही. माझं आंदोलन प्रत्येकाला घटनेने दिलेले अधिकार मिळावेत यासाठी आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस गुन्हे आणि सनश्यास्पद मृत्यू वाढताहेत.
पंतप्रधान मोदिला हरवणे काँग्रेस पक्षाच्या हातून जमणार नाही. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात अपराधींनी जेल भरले आहेत. मोदींना गुजरातला परत पाठवण्याचे धाडस फक्त प्रादेशिक पक्षातच आहे.
काँग्रेस धर्म निरपेक्षतेचे तर भाजपा राष्ट्रयतेचे दुकान चालवत असून त्यांच्याकडून आम्हाला सर्टिफिकेट ची गरज नाही.
सिपीएड मैदान येथे सभा झाली. बेळगाव उत्तर मधील उमेदवार अश्फाक मडकी,शिवन गौडा पाटील,या जे डी एस उमेदवारांच्या यांच्या प्रचारासाठी ते आले होते.