Wednesday, November 20, 2024

/

उत्तरेत समितीचाच प्रचार करणार भाजपचा नाही -संज्योत बांदेकर

 belgaum

मी मराठी नगरसेवकांच्या गटाशी बांधील आहे कोणताही पसरिस्थितीत भाजपच्या उमेदवारास पाठिंबा देणार नाही अशी स्पष्ट भूमिका माजी महापौर संज्योत बांदेकर यांनी मांडली आहे.sanjyot bandekar 1

नगरसेवकांची बैठक आहे असं मला सांगण्यात मी तिथे गेले नाही तरी देखील माझ्या नावाचा वापर करून पाठिंबा असं सांगण्यात आलं हे पूर्ण पणे चुकीचं आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचाच प्रचार मी करतं आहे माझा उत्तर मतदार संघात पूर्ण पाठिंबा हा एकीकरण समितीलाच आहे असेही त्या म्हणाल्या.
उत्तर मतदार संघात भाजपला अनेक मराठी नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा खासदार कोरे यांनी केला होता त्यात माजी महापौर संज्योत बांदेकर यांच नाव देखील सामील करण्यात आलं होतं.
मराठी अस्मिता आणि सुप्रीम कोर्टातील खटल्यात आपली शक्ती दाखवण्यासाठी उत्तर मतदार संघात राष्ट्रीय पक्षांच्या भूलथापाना बळी न पडता समिती उमेदवारांना मतदान करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.