बेळगाव ग्रामीण मतदार संघात एकीकरण समितीत दोन उमेदवार आणि भाजपची विध्यमान आमदारां विरुद्ध नाराजी त्यामुळे काँग्रेसचे पारडे जड झाले आहे.
ग्रामीण भाग मराठी भाषिकांचा आहे,पण सतत संपर्क, भेटवस्तूंचे वाटप आणि सरकारी कामे करून देऊन काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकरयांनी आपली पकड मजबूत केली आहे.भाजपचे विध्यमान आमदार संजय पाटील यांच्या विरुद्ध गेली दहा वर्षे काहीही कामे ने केल्याचा ठपका ठेवत एन्टी इन्कमपन्सी असू शकते त्याचा नेमका लाभ समितीच्या उमेदवाराला होतो की कॉंग्रेसला यावर ग्रामीण मधल्या विजयाचा बरच काही गणिते अवलंबून आहेत.बेनकनहळळी येथील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेतील गर्दीमुळे लक्ष्मी हेब्बाळकर याचं मनोबल वाढलेलं असेल कारण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने मराठी बहुल पश्चिम भागात घेतलेल्या सभेला जमलेली एवढी गर्दी याचं मुख्य कारण आहे.
गेल्या निवडणुकीत समितीत उभी फुट होती शिवाजी सुंठकर यांच्या सारखे दिग्गज उमेदवार एकमेका समोर उभेत होते तर भाजपात के जी पी विरुद्ध भाजप असा सौम्य संघर्ष होता आणि कॉंग्रेस मध्ये देखील विध्यमान उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात गडदेवरमठ हे उभे होते निकालात लढत तिरंगी झाली आणि विजयाच अंतर केवळ दोन हजार मतांचं होत मात्र यावेळी परिस्थिती निव्वळ वेगळी आहे कॉंग्रेस मध्ये देखील मोहन मोरे हे जिल्हा पंचायत सदस्य बंडखोर आहेत समिती कडून देखील मोहन बेळगुंदकर उभे आहेत.
अस असेल मतांचं गणित–
मागील निवडणुकी सारखी मोठ्या प्रमाणात समितीत यावेळी बंडखोरी झालेली नसली तरी अंतर्गत नाराजी दूर करण्याच फार मोठ आवाहन तालुका समिती नेत्यावर आहे. सुनील अष्टेकर सारखे दुसऱ्या गटातील नेते मुख्य प्रवाहात सामील झालेत मात्र ते खरोखर समितीसाठी काम करणार आहे का ?फक्त बंडखोरीचा ठपका पुसून घेण्यासाठी समीतीत दाखल झालेत हे देखील पाहावे लागणार आहे कॉंग्रेसच्या दृष्टीकोनातून कन्नड भाषिक असलेले जे डी एस चे शिवनगौडा पाटील पूर्व भागात किती मते मिळवतात संजय पाटील यानां पूर्व भागात कसा कसा प्रतिसाद मिळणार यावर देखील कॉंग्रेसच गणित अवलंबून आहे.
प्रचाराच्या मधल्या टप्यात कॉंग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आघाडी घेतलेली दिसते मात्र समितीचे किणेकर देखील हळूहळू पुढे सरकताना दिसत आहेत. सगळीकडे किणेकरांच्या प्रचार सभांना गर्दी होत आहे प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण पुरता एकत्र आलेले कार्यकर्ते व्यवस्थित राबल्यास किणेकर देखील हेब्बाळकर यांना कडी टक्कर देऊ शकतात. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात सगळीकडे समिती विरुद्ध कॉंग्रेस अशीच लढत दिसत आहे त्यामुळं भाजपचे संजय पाटील सध्या तरी चित्रातून गायब झालेले दिसत आहेत .9 रोजी होणारी मोदींची सभे नंतर भाजपला फायदा मिळतो का पाहावे लागेल.