खानापूर मतदारसंघात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार विलास बेळगावकर आघाडीवर आहेत. या मतदारसंघात निवडून येण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि मतांचे बळ विलास बेळगावकर यांनी मिळवले असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागाला यापूर्वी कधीच आमदारकीची संधी मिळाली नाही, जनता खुश झाली असून आपल्या भागातला उमेदवार काहीही प्रयत्न करून निवडून आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.जनता स्वतः पैसे जमवून बेळगावकर या प्रामाणिक समिती कार्यकर्त्यांचा प्रचार करत आहे.
बेळगावकर हे पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांचा विजय पक्का आहे असे वातावरण खानापूर मध्ये तयार झाले आहे. विलास बेळगावकर जरी आघाडीवर असले तरी समितीचे आमदार अरविंद पाटील यांनी मॅन मनी मसल चा वापर करून प्रचारात आघाडी घेतलीय बेळगावरांच्या मागोमाग ते आहेत मात्र भाजप आणि काँग्रेसच्या नाराज मतांना आपल्या कडे खेचण्यात समितीचे दोन्ही उमेदवार बऱ्या पैकी यशस्वी होताना दिसत आहेत. राष्ट्रीय पक्षातील भाजप काँग्रेस आणि जनता दलाच्या उमेदवारांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.