Sunday, January 5, 2025

/

कणकुंबीतुन विलास बेळगांवकराना विजयी करण्याचा निर्धार

 belgaum

खानापूर तालुक्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखणाऱ्या  पश्चिम भागामधील कणकुंबी येथे समितीचे उमेदवार विलासराव बेळगावकर यांची प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली.

Vilas belgavkar
यावेळी या भागातील चीगुळे गावातील युवतींनी पारंपरिक वेशात सहभाग घेतला होता,यावेळी कणकुंबी  माऊली मंदिराजवळ हजारो समिती समर्थक कार्यकर्ते एकत्र येऊन माऊली मंदिरापासून  पदयात्रेला सुरवात करून संपूर्ण कणकुंबी गावामधून बाजारपेठेतून पदयात्रा काढण्यात आली.अनेक घरांमधून स्त्रियांनी बेळगावकरणा औक्षण करून विजयासाठी च्या शुभेच्छा दिल्या

पद यात्रेचे रूपांतर कोपरा सभेमध्ये झाले,अध्यक्षस्थानी कणकुंबी गावाचे प्रतिष्ठित नागरिक राजाराम गावडे होते यावेळी म ए समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील माजी आमदार  खानापूर तालुका,अधिकृत उमेदवार विलासराव बेलगवकर ,गर्लगुंजी जिल्हा पंचायत सदस्य नारायणराव कार्वेकर,जांबोटी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई,ता पं सदस्य पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार ,भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील,ओलमनी गावाचे प्रतिष्ठित नागरिक वसंतराव नावलकर ,कुपटगिरी चे संभाजीराव पाटील,नारायण पाटील ,हलशिवाडीचे अर्जुन देसाई,माजी जी पं सदस्य व माजी आमदार अशोकराव पाटील यांचे सुपुत्र विशालराव पाटील यांच्यासह तालुक्यातील हजारो समितीप्रेमी समर्थक उपस्थित होते,

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.