खानापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीत मराठी विरुद्ध मराठी लढत रंगली असून आमदार अरविंद पाटील विरुद्ध खानापूर समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील गटाचे दिगंबर पाटील गटाचे विलास बेळगावकर हे एकमेका विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत.
गेल्या पाच वर्षात आमदार अरविंद पाटील यांनी २०० कोटींची विकास कामे केली आहेत त्यातल्या त्यात पूर्व भागातील कन्नड भागात मराठा समाजाची वोट बँक मजबूत केली आहे आणि हाच मुद्दा घेऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहेत तर दुसरीकडे विलास बेळगावकर हे गेल्या २५ वर्षात सीमा प्रश्नांच्या लढ्यात एक साधा आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून झटलेले आहेत. मागील निवडणुकीत विध्यमान आमदार अरविंद पाटील यांना आमदारकी सोडून दिली होती एक सच्चा गरीब कार्यकर्ता म्हणून त्यांना खानापूर तालुक्यात प्रचंड सहानुभूती मिळत आहे. विधानसभा निवडणुकी साठी त्यांना मराठी समाजातून लहान मोठ्या देणग्या मिळत आहेत सहानुभूतीची प्रचंड लाट तयार होत आहे.
खानापूर तालुक्यात समितीतच दोन उमेदवार नाही तर भाजप आणि कॉंग्रेस मध्ये देखील उभी फुट आहे. कॉंग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर यांना देखील प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत असून मागील वेळचे कॉंग्रेस उमेदवार रफिक खानापुरी यांनी देखील आपली नाराजी उघड केली आहे त्याचा फटका कॉंग्रेसला बसणार आहे तर भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या विरोधात माजी आमदार कै प्रह्लाद रेमाणी यांचे पुत्र जोतीबा रेमाणी यांनी बंडखोरी केली आहे तर भाजप नेते बाबुराव देसाई नाराज आहेत. निधर्मी जनता दलाच्या वतीने उद्योजक नासीर बागवान हे निवडणूक लढवत असून मुस्लीम आणि कन्नड भाषिक मते मिळवणार आहेत. त्यामुळे सद्य स्थितीतले खानापूर तालुक्यात समितीत मराठी विरुद्ध मराठी लढत असली तरी खरी रंगत अरविंद पाटील यांच्या विकास विरुद्ध विलास बेळगावकर यांच्या सहानभूतीत होणार आहे.