उमेदवारी न मिळालेले दक्षिण मतदार संघातील अनेक भाजप नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत त्यांनी छुप्या पद्धतीने काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार देखील सुरू केला आहे.
दक्षिण भाजपच्या तिकिटासाठी 12 जणांनी लॉबिंग केली होती मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी होती त्यातील काही जणांनी उमेदवारी अर्ज भरला काही जण निवडणूक लढवत आहेत काही जण काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत तर काहींनी काँग्रेस हाय कमांड शी संपर्क साधून प्रवेश करण्याची बोलणी देखील सुरू केली आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघात केवळ समितीच नव्हे तर भाजपला देखील संघर्ष करावा लागत आहे हे यातून सिद्ध होत आहे.
Trending Now