भाजप मधून बंडखोरी करून बेळगाव दक्षिण मतदारसंघात अपक्ष उभे असलेले उमेदवार सुजित मुळगुंद यांना पाठींबा वाढत आहे. मतदार स्वच्छ आणि भ्रष्टाचार विरोधी चेहरा म्हणून आपल्याला मतदान करण्यास तयार आहेत. असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले.
घरोघरी जाऊन २५ हजार घरात भ्रष्टाचारी उमेदवाराला मतदान करू नका, अशी जागृती आपण केली आहे. आताही आपल्या पक्षाने चुकीचा उमेदवार दिला यासाठी अपक्ष थांबलो आहे. लोक मला पूर्ण पाठींबा देत आहेत असे त्यांनी माहिती दिली.
भ्रष्टाचार निर्मुलन परिवार संघटनेच्या वतीने मी भ्रष्टाचार विरुद्ध लढत आहे, तेंव्हा जनता मलाच मत देणार असे ते म्हणाले. पिरनवाडी चिदंबरनगर भाग्य नगर राणी चन्नमा नगर टिळकवाडी आदी भागातून मला पाठिंबा मिळत आहे असा दावा ही सुजित यांनी केला आहे विशेषता उपनगरात भ्रष्टाचारा बद्दल जन जागृती साठी पाठिंबा मिळालाय असेही ते म्हणाले .