राज्यात काँग्रेस उमेदवाराना टारगेट करून केंद्र सरकार कडून आय टी रेड मारण्यात येत आहे असा गंभीरआरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.
बेळगावातील सांबरा विमानतळावर बोलताना ते बोलत होते.केवळ लक्ष्मी हेब्बाळकर रमेश जारकीहोळी यांच्यावरच आय टी रेड का? प्रभाकर कोरे यांच्या कडे पैसे नाहीत का?येडीयुरप्पा यांनी लूट केली नाही का?अंगडी जगदीश शेट्टर यांच्यावर का आय टी रेड नाही असा सवाल देखील त्यांनी केला.
एका पक्षाला टार्गेट ठेऊन जाणून बुजून आयकर धाडी केल्या जात आहेत असा आरोप देखील त्यांनी केला.चामुंडेंश्वरी सोडून बदामी निवडणूक घाबरून लढवत नाही तर उत्तर कर्नाटकाच्या विकास साठी निवडणूक लढवत असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.हाय कमांडच्या सूचनेनुसार देखील हा निर्णय घेतला मोदींनी देखील दोन मतदार संघात लढले होतेच की असेही ते म्हणाले. जनतेच्या अन देवाच्या आशीर्वादाने मी दोन्हीकडे जिंकू असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला.