मागील वेळे प्रमाणे आजही कपिलेश्वर ओव्हर ब्रिज वरील वाहतूक बंद राहणार आहे. याची नोंद घेऊन जास्तीतजास्त नागरिकांनी धारवाड रोड येथील ब्रिज वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
गुड्स शेड रोड येथे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन घालण्यात येणार आहेत.यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहापूर कडून येणाऱ्या नागरिकांनी भातकांडे हायस्कुल कडून जाऊन धारवाड रोड ब्रिज चा आधार घेतल्यास रहदारीचा त्रास होणार नाही. याची नोंद घ्यावी.