निवडनोक लागो झाल्या पासनं जे बी काय काय सुरू करल्यासताय ते अत्त बोलतलं नक्को, अत्त एकूच दिवस शिल्लक हाय कायबी करोन एकी करोन मोकळे होवा हेच माझं सांगनं हाय.
समिती निवडोन ईल असं वातावरन दिसोलाय. सगळ्या मदार संघात लोकं जागी झाल्याताय, या वातावरनास बेकी धोक्याची हाय, कोन कोल्हापूरास जाऊन उमेद्वारी घून येला त्यांसनं बलवून घेवा, पाईक आनी मंच वाले एक होवा पयला आनी उरल्या दिसात अमासनं एकीचा सूर्य दाखवा ही एकूच ईनंती हाय.
खानापुरास, बेळगावास आनी तालुक्यास समितीचा आमदार होऊस पाजे तर काय करतलं ते करा,
आनी भांडतलं अश्याल तर मानं निवडनोक सरल्यार भांडुवा अत्त जरा माघार घेवा आनी समितीस यश देवा.