आगामी विधान सभेसाठी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी भाऊ गर्दी केली होती.उमेदवार अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दीच झाली होती.
बेळगाव दक्षिण मतदार संघातून एकीकरण समितीच्या वतीने प्रकाश मरगाळे, किरण सायनाक,पंढरी परब, रतन मासेकर,विनायक गुंजटकर आणि किरण गावडे तर ग्रामीण मतदार संघातून पावशे अष्टेकर समिती गटातून सुनील अष्टेकर, मनोज पावशे, मोहन बेळगुंदकर, लक्ष्मण होनगेकर आदींनी नामांकन केलं.
बेळगाव दक्षिण मतदार महा पालिकेतील कार्यालयात दुपारी तीन वाजता वेळ संपल्या वर देखील टोकन देऊन पाच वाजे पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती.बेळगाव दक्षिण मधून 28 जणांनी ,उत्तर मधून 20 तर ग्रामीण मधून 18 जणांनी अर्ज दाखल केले.
आजपर्यंत बेळगाव ग्रामीण मधुन काँग्रेसकडुन लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपकडुन संजय पाटील, निजद कडुन शिवनगौड पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीकडुन सुनिल अष्टेकर, मनोज पावशे, लक्ष्मण होनगेकर, मोहन बेळगुंदकर, मनोहर किणेकर, तर अपक्ष म्हणुन मोहन मोरे, यल्लापा आचार्या, सदानंद भातकांडे, महमंदरफिक मुल्ला यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
बेळगाव उतर मधुन: काँग्रेसकडुन फिरोज सेठ, भाजपाकडुन अनिल बेनके, एनसीपी रहिम दोडमनी, आपमधुन फारुकसाब नदाफ, निजदकडुन जी.सी.धर्मराज, म.ए समितीकडुन बाळासाहेब काकतकर, संभाजी पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर बेळगाव दक्षिण मधुन : भाजपातुन अभय पाटील, काँग्रेसकडुन एम.डी.लक्ष्मीनारायण, आपकडुन सदानंद मेत्री, निजद कडुन महेश कुगजी तर अपक्ष श्रीनिवास ताळुकर, अपक्ष म्हणुन वर्धमान गंगाई, बंडखोर भाजप शंकराचार्य तर मए समितीकडुन प्रकाश मरगाळे, किरण गावडे, रतन मासेकर किरण सायनाक, पंढरी परब यांचे अर्ज दाखल झाले आहेत. उद्या अर्जांची छाननी होणार असुन २७ रोजी सायंकाळी लढती स्पष्ट होणार आहेत.