किंग मेकर…,साहेब…, समितीचा वाघ…, द रियल किंग अश्या अनेक टोपण नावांनी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच संभाजी पाटील…बेळगाव नगरीचे चार वेळा महापौर पद आणि एकदा आमदारकी भूषविलेले असे समिती मधील एक लोकप्रिय नेतृत्व… ‘महाराष्ट्र एकीकरण समितीचा वाघ’ म्हणून परिचित संभाजी पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून डरकाळी फोडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर संभाजी पाटील हे उत्तर मधुन निवडणूक लढवणार असल्याचं समोर येत आहे समिती नेतृत्वाने आमदार पाटील यांची अल्पसंख्याक समाजात असलेल्या इमेज चा फायदा घेण्याचा प्लॅन बनवला असून समितीचे 30 हजार आणि इतर मतांची गोळा बेरीज करून पाटील यांनाच उत्तर मधून उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सध्या सोशल मीडिया वर ‘टायगर जिंदा है’ हा ट्रेंड आमदार संभाजी पाटलांच्या बाबतीत सुरू करण्यात आला आहे या वाघाने उत्तर मध्ये डरकाळी फोडणार.
. अशी केवळ माहिती समोर येताच विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकू लागलो आहे मागील वेळी उत्तर मतदार संघात 28 हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर असलेली समिति यावेळी जिंकण्यासाठी लढणार आहे याबाबत खास रणनीती बनवली जात आहे.