एकीकरण समितीतील एकी साठी शिवाजी उद्यान येथे सीमा तपस्वी अॅड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र एकिकरण समितीच्या गटा- तटातील बेकी दूर करून येत्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत प्रत्येक मतदार संघात एकच उमेदवार द्यावा व मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी बेळगांव सह सीमाभागात म. ए. समितीचे आमदार कर्नाटक विधानसभेत मराठीचा हुंकार जागविण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या केसमध्ये महाराष्ट्रात सामिल होण्यासाठी प्रबळ लोकेच्छा दाखविण्यासाठी हे एक दिवसाचे आत्मक्लेश प्रार्थना सभा सुरू आहे .
यावेळी प्रार्थना सभेत उद्योगपती ,महादेव चौगुले , राजेंद्र मुतगेकर , एन .बी. खांडेकर, अजित यादव , दिगंबर पवार , शिवाजी पट्टण , गोविंद राऊत , ईश्वर लगाडे , शिवसंत संजय मोरे , एम.वाय. घाडी , प्रदिप मुरकुटे, लक्ष्मण मेलगे, ए .ओ. यतोजी, युवराज हुलजी, एस .ए. पाटील , बाळाराम पाटील , बाळासाहेब फगरे , सीमा सत्याग्रही किसनराव यळ्ळूरकर , सीमा कवी रवि पाटील यासह सीमाबांधव बहूसंख्य उपस्थित आहेत