काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी कर्नाटकात प्रचारक म्हणून काम करताना सीमाभागात अजिबात काँग्रेसचा प्रचार करू नये. अशी विनंती सीमाभागातील समिती कार्यकर्ता साईनाथ शिरोडकर याने ट्वीटर वरून केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्यासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र अमित देशमुख आज काँग्रेस पक्षातून सक्रिय राजकारणात आहेत. आणि पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचारक म्हणून.यामुळेच ही विनंती करण्यात आली आहे.
अमित देशमुखांनी आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन सीमाभागात समितीचा प्रचार करावा, कै विलासरावानी सुप्रीम कोर्टात दाखल केलेला दावा अजून संपलेला नाही, सीमाप्रश्न सुटलेला नाही,त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारास यावे अशी मागणी सीमाभागात होत आहे.
असे ट्वीट करून अमित देशमुख यांना समितीचा प्रचार करा अशी मागणी करण्यात आली आहे. हे ट्विट बघून स्वर्गीय विलास रावांचे पुत्र नक्कीच बेळगावातील मराठी जणांचा विचार करतील