एकीसाठी साठी गेले कित्येक दिवस समितीत प्रयत्न होत असताना बेळगाव ग्रामीण मतदार संघातून एकीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.मराठी भाषिक युवा आघाडी आणि तालुका समितीत दिलजमाई झाली आहे.मराठी भाषिक युवा आघाडी आणि तालुका एकीकरण समितीत दिलजमाई झाली आहे कॉलेज रोड वरील युवा आघाडीच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.यावेळी तालुका समितीच्या वतीने भाऊ गडकरी यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षे किणेकर आणि भाऊ गडकरी यांच्यात कटुता होती निवडणुकीच्या निमित्ताने ती दूर झाली आहे .तालुका समितीत झालेल्या एकीची सुरुवात शहर आणि खानापुरात येईल अशी अपेक्षा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केली आहे तर मराठीच्या अस्तित्वासाठी आम्ही एकी केली आहे असे मत भाऊ गडकरी यांनी व्यक्त केली यावेळी शिवराज पाटील अरुण कानूरकर,गीता बस्तवाडकर,एल आय पाटील, निंगोजी हुद्दार आदी उपस्थित होते.