मला एक मुलगा आहे, स्त्री जातीचा आदर करण्याची भावना त्याला शिकवणे ही माझी जबाबदारी आहे. ही शिकवण मी त्याला देणार अशी शपथ प्रत्येक पालकांस घ्यायला लावणारी नवी मोहीम नियती फौंडेशन ने आखली आहे.
स्त्री ही वासना आणि बदला घेण्याची वस्तू नाही. ती ही माणूस आहे, प्रत्येक मुलगी, बाई, युवती ही आदराचे स्थान आहे, अशी शिकवण पालकांनी आपल्या मुलाला द्यावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रतिकाराची शिकवण स्त्री जातीला देणे पुरेसे नाही, तीन वर्षांची बालिका आणि ८० वर्षांची वृद्ध महिला प्रतिकार करू शकत नाही. मुलांना पुरुष होतानाच स्त्री कडे बघण्याची माणुसकी शिकवावी लागेल. यासाठी एक भली मोठी साखळी नियती फौंडेशन करणार आहे. www.niyathifoundation.com च्या माध्यमातून. चला सहभागी होऊया.
Trending Now