काँग्रेस व भाजप पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. आता जेडीएस पक्षाच्या यादीकडे मतदार लक्ष ठेऊन आहेत.
बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण मध्ये जेडीएस चा उमेदवार कोण असेल याची चर्चा आहे, या पक्षाची या भागात स्वतंत्र वोट बँक नाही, पण कर्नाटकातील आगामी राजकारण लक्षात घेऊन सरकारमध्ये जेडीएस चे वजन राहील या दृष्टिकोनातून जेडीएस चे उमेदवार होण्यालाही महत्व आले आहे.
सरकार मध्ये आपल्या मतदार संघाला प्रतिनिधीत्व मिळवून द्यायचे असेल तर जेडीएस उमेदवाराला मतदान करा असा प्रचार सुरू झाला आहे. याचा फटका काँग्रेस आणि भाजप उमेदवाराला किती बसतो याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
Trending Now