बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजप कडून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला, आपल्या मालमत्तेचे विवरण देतांना त्यांनी १० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता दाखवली आहे.
२०१३ मध्ये त्यांची मालमत्ता ७ कोटी च्या आसपास होती आणि २००८ मध्ये २.६६ कोटी इतकी होती म्हणजे मागील १० वर्षात त्यांच्या मालमत्तेत आठ कोटींची तर मागील पाच वर्षात तीन कोटींची वाढ झाली आहे.
२००८ मध्ये संजय पाटील पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१३ च्या निवडणुकीतही त्यांनी अनपेक्षित यश मिळवले होते. सलग दहा वर्षे ते आमदार आहेत. गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून ते काम पाहतात.