सुरुवातीपासून पाईक गटाकडून होत असलेल्या एकीच्या प्रयत्नांना आपण योग्य प्रतिसाद दिला आहे. एकीच्या प्रयत्नांना मी कधीच विरोध केला नाही मात्र वादग्रस्थ लोकांना घेऊन स्थापन झालेल्या स्मृती मंचच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शहर म ए समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केला आहे.
ज्या स्मृती मंच ने माणसे पाठवण्याचे आवाहन केले त्यालाही आपण प्रतिसाद देऊन माणसे पाठवली, पण त्यांनी चुकीची माणसे पाठवून उगाच वेळ घातला, कुठे यायचे, केंव्हा यायचे हे सुद्धा सांगितले जात नाही आणि किरण ठाकूर येत नाहीत अशी बदनामी केली जाते हे चुकीचे आहे.
आज गुरुवारी सकाळी पासून मी त्यांची वाट पहात आहे पण दीपक दळवी फोन केले आपण दीपक दळवी यांच्याशी वारंवार सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला पण बैठकीचे ठिकाण कळवण्यात आले नाही, यामुळे शेवटी दळवी यांना यांच्या घरी घरपोच पत्र पाठवले आहे त्याच देखील अद्याप उत्तर मिळालेलं नाही असेही त्यांनी सांगितले.
आदरणीय राम आपटे यांच्या देखील घरी मी स्वतः जाऊन आलो मात्र त्यांचा देखील संपर्क झालेला नाही मला एकि हवी आहे, मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आता लोकांनीच काय ते समजून घ्यावे असेही ते म्हणाले.
मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि राजेंद्र मुतगेकर यांना बेळगाव live ने गुरुवारी सायंकाळी अनेकदा फोन करून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही ज्या कै सुरेश हुंदरे यांनी एकी घडवून मागील निवडणुकीत दोन जागा निवडून आणल्या त्यांच्या नावाने एकीसाठी प्रयत्नशील स्मृती मंचच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याची चर्चा आहे.