वैशाख सुरु झाला आणि उन्हाचा तडाखा वाढला म्हणूनच अक्षतृतीयेला जलदान करावे असे शास्त्र सांगते . त्यामुळे सर्वत्र पाणपोई सुरु करण्यात आल्या आहेत.
खडेबाझार, समादेवी गल्ली, शहापूर खडेबाझार येथे, आर पी डी कॉर्नर येथे ही पाणपोई ठेवण्यात आली आहे.
हल्ली वॉटर प्युरिफायर उपकरणाची मागणी वाढली आहे परंतू माठातील पाणी अधिक सुरक्षित असल्याचे आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे . नुकत्याच झालेल्या एका व्याख्यानात डॉक्टर जयश्री नेऊरगावकर यांनी माठातील पाण्याचे गुणधर्म सांगितले होते . या पाण्यातून खनिज अधीक मिळते म्हणूनच वैशाखात सर्वत्र
पाणपोइ सुरू करण्याचा प्रघात पडला आहे .
सध्या लोक आरोग्याबद्दल अधीक जागृत झाले आहेत त्यामुळे शुद्ध पाण्याचा आग्रह धरला जातो म्हणूनच पूर्वजांनी माठातले पाणी पिण्याची प्रथा सुरू केली होती ते पाहता जुने तेच सोने याचा प्रत्यय येतो .
या पाणपोई भर उन्हात कोरड्या होणाऱ्या घश्यांना नक्कीच सुखावत आहेत.
Trending Now