बेळगाव दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.विविध ठिकाणच्या शेकडो महिला, असंख्य मतदार आणि जनतेच्या वाढत्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून खास बेळगाव live कडे आपली भूमिका मांडली आहे.
सर्वभाषिक व सर्वधर्मीय तसेच अल्पसंख्याक, मुस्लीम, ख्रिश्चन,मागासवर्गीय,चर्मकार विविध समाजातील मान्यवरांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवीण्याचा आग्रह धरला असून त्यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
आज सकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणूक यशस्वी पणे लढवीण्याचा कार्यकर्यांनी विश्वास व्यक्त झाला.
संभाजी पाटील यांच्या उमेदवारी मुळे पुन्हा एकदा मराठी भाषिकांत विश्वासाचे नवे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच दक्षिणेतून निवडणूक लढवीण्यासाठी चाललेल्या अनेक नगरसेवकांनी साहेबांच्या उमेदवारी बद्दल आनंद व्यक्त केला असल्याची माहितीही देण्यात आली. संभाजी पाटील यांच्या उमेदवारी मुळे मराठी भाषिकां बरोबरच विविध समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.