बेळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. या बनावट नोटा साठेबाजी करणारा अजित निडोनी रा.मूळ विजापूर याला आज पहाटेच अटक करण्यात आली आहे.
छाप्यात आढळलेल्या नोटा
7 कोटीच्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.५०० आणि २००० च्या बनावट नोटांचा साठा मध्यरात्री बेळगाव पोलिसांनी जप्त केला आहे.
या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगर मधील पी डब्ल्यू डी कॉटर्स मधील मंजुनाथ बागल कोटीी घरात हा साठा सापडला आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी या नोटा आणलेत असा संशय आता बळावला आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोठ्या बंदोबस्तात पहाटे पर्यंत मोजदाद सुरू होती.याचवेळी दुसरे पथक पाठवून निडोनी यास अटक करण्यात आली.
घरात एका तिजोरीत या बनावट नोटांचा साठा करण्यात आल्याचे दिसून आले . निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही दाखल होऊन रात्री उशीरा पर्यंत पंचनामा केला. आता या नोटा कुठे छापल्या आणि कुणासाठी वाटणार होते याचा शोध सुरू आहे.
निडोनी हा यापूर्वी बनावट नोटा छापल्या प्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणातील तो जुना गुन्हेगार आहे, यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.