belgaum

प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता राहिलं-विलास बेळगावकर

0
1155
vilas belgavkar
 belgaum

गेली अनेक वर्षे मी समितीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहे खानापूरच्या समितीनिष्ट जनतेसोबत मी काठ्या झेलल्या आहेत तुरुंगवास भोगला आहे या खानापूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे मागील वेळीही ही ही सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी होती तरी मी समितीला महत्व देत माझी उमेदवारी माघारी घेतेली होती मी सामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे धन दांडग्यांचा नव्हेमला खात्री आहे खानापूर येथील मलाच निवडून आणील असे मत खानापूर समितीचे विलास बेळगावकर यांनी व्यक्त केल आहे.

vilas belgavkar

मी समितीकडे अर्ज केला होता लोकेछेला मान देऊन अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे माझ्या सोबत शेकडो कार्यकर्ते आहेत  मध्यवर्ती समिती कडून मला अपेक्षा आहेतमातीशी आणि समितीशी इमान राखणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करून ते चुकीचा संदेश जनतेसमोर देणार नाहीत असा विश्वास मला वाटतो असे ते म्हणाले.

 belgaum

सर्व सामान्य मराठी माणसाची लोकेच्छा हे माझ्या उमेदवारीचे बळ आहे आणि त्या विश्वासावर मी मराठी माणसाला विजय मिळवून देणार असेही ते म्हणाले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.