सांबरा विमानतळाच्या विस्तारीकरणात जमीन दिलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई मिळण्यास एक तप उलटले आहे. सोमवारी यापैकी पाच शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश देण्यात आले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांना आठवड्यात भरपाई दिली जाणार आहे. २००६ मध्ये हे संपादन झाले होते. त्यावेळी एकरी १ लाख ८० हजार रुपये भरपाई देण्याचे ठरवण्यात आले होते, याला विरोध होताच एकरी ५ लाख देण्याची तयारी करण्यात आली. पण ५० शेतकरी पुन्हा विरोध करून न्यायालयात गेले होते.
२०१६ मध्ये हा निकाल लागून न्यायालयाने एकरी १३ लाख व इतर असे व्याजासहं ४० ते ५० लाख देण्याचा आदेश दिला होता, आता भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे.