फिशर म्हणजे भेग पडणे. एनल फिशर म्हणजे गुदव्दाराकडे भेगा पडणे होय. शौचास झाल्यावर रक्त पडल्यामुळे किंवा शौचाच्या जागेवर दुखण्यामुळे हा विकार लक्षात येतो.
भगेंद्रचे दोन प्रकार असतात.
1. अक्युट
2. क्रॉनिक
अक्युट प्रकारामध्ये दाह व कळ जास्त असतात. क्रॉनिक प्रकारात दाह व दुखणे जरा तुलनेने कमी असतते. या भेगा खोलवर किंवा वरवर असू शकतात. शक्यतो या भेगा मागील बाजूस जास्त असतात.
कारणे व लक्षणे-
शौचाला साफ होत नसल्यास जोर करण्याने गुदव्दार स्नायू अतिप्रमाणात ताणले जातात. व तेथील त्वचा ताण सहन न झाल्याने फाटते. यामुळे भगेंद्र होते. गुदव्दाराचे स्नायू कायम आवळलेल्या स्थितीत असतात. फक्त मलविसर्जनावेळी ते प्रसरण पावतात. मग ताण असह्य झाल्यास तेथील नाजक त्वचा फाकते व कत्रे पडतात. काही वेळा या भेगा आपोआपच भरून येतात तर काही वेळा अनेक दिवस राहातात. प्रत्येक मलविसर्जना वेळी असह्य दाह होतो. रक्त पडते. गुदव्दाराला सूज येते. व्यवस्थित बसता येत नाही. कळा येतात. ठणका मारतो. प्रसुतीच्या वेळी कळा देतात खूप जोर केल्यास फिशर होऊ शकतात. लहान बाळांची स्वच्छता ठेवताना कापडाने पुसताना इजा होऊन फिशन होऊ शकते. टॉयलेट पेपर वापरण्याने आजार वाढू शकतो. पाण्याने स्वच्छता राखणे योग्य.
उपचार- मुख्य उपचार म्हणजे शौचास व्यवस्थित व वेळेवर होणे होय. त्याकरिता आहारात पुरेसा चोथा म्हणजे तंतुमय पदार्थ असणे आवश्यक असते. त्याकरिता सॅलडस्, फळे, भाज्या, गव्हाचा कोंडा इ. उपयुक्त असतात. टबमध्ये गरम पाणी घालून त्यात बसून शेक घेतल्यानेही फायदा होतो. रूढ उपचारांमधे नायट्रोग्लीसरीन आईंटमेंट, डील्टीयाझेम, निफेडिपिन, लिंडोकेन अशी मलम वापरली जातात. त्याप्रमाणे शौचाची जागा रूंद करण्यासाठी काही साध्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. परंतु असे करण्याने क्वचित मलविसर्जनावरचे नियंत्रण रहात नाही व अवघड होऊन बसते.
होमिओपॅथीक उपचार-
होमिओपॅथीक उपचारांनी तिहेरी फायदा होतो.
1. शौचास साफ होते. मल मऊ असल्याने इजा होत नाही.
2. गुदव्दाराचे स्नायू रहातात त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागत नाही.
3. पडलेल्या भेगा व अंतस्थ त्वचेतील जखमा भरून येतात व पुनरावृत्ती टाळता येते.
औषधे- कोलीनसोनिया, रोबिनिया, रटानिया, अॅसिड नायट्रिकम, अॅसीड सल्फ, सल्फर इत्यादी औषधे योग्यतेनुसार वापरावी लागतात.
संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८