कोणत्याही परिस्थितीत एकी करा अन्यथा कुणाचीही उमेदवारी जाहीर करू नका, अशी मागणी आज सिमवासीयांचे नेते एन डी पाटील यांच्याकडे करण्यात आली
यांच्याकडे पाईकांनी केली. यावेळी जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतील तर सर्वप्रथम एकी करण्याची गरज आहे. नाहीतर आम्हाला नोटा करण्याची मुभा द्या अशी मागणीही करण्यात आली. गेले तीन महिने आम्ही एकीसाठी झटत आहोत तरी नेत्यांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप देखील केला.
मदन बामणे, श्रीकांत कदम, सुनील बाळेकुंद्री, दत्ता जाधव, साईनाथ शिरोडकर, चंद्रकांत पाटील, रत्नप्रसाद पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज एन डी पाटील यांची भेट घेतली.यावेळी बेकीलाच ब्रेक लावा आणि कुणी मागे चुका केल्या याचे भांडवल न करता लवकरात लवकर एकी झालीच पाहिजे असे त्यांनी सांगितले.आम्ही तुमच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत, तुमचा निर्णय आम्ही ऐकल्याशिवाय जाणार नाही. कार्यकर्ते आणि जनता समिती उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नात असताना नेत्यांचे मतभेद याला कारणीभूत आहेत याचीही कल्पना देण्यात आली.
कोण उमेदवार आहे हे आम्हाला महत्वाचे नाही आम्हाला प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार हवा आहे तेंव्हा जोपर्यंत एकि होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे सांगून मागील तीन वर्षांपासून आम्ही प्रयत्न करीत असताना नेते प्रतिसाद देत नाहीत याचीही कल्पना देण्यात आली.यावर आपण मध्यवर्ती समितीशी चर्चा करून योग्य तो निर्णय देण्यात येईल असे एन डी पाटील यांनी सांगितले.