बेळगाव बार असोसिएशन ने गुरुवारी पोलिसांकडून वकिलांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांचा विरोध करून काम बंद आंदोलन छेडण्यात आले आहे.
वकील याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास जात असताना पोलिसांनी अडवणूक केली तेंव्हा रास्तारोको करून काम बंद चा इशारा देण्यात आला.
एम बी जिरली, हर्षवर्धन पाटील आणि रतन मासेकर यांच्या विरोधात घातलेल्या गुन्ह्यांचा निषेध नोंदवण्यात आला, पोलिसांनी हे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावा असे निवेदनही सादर करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर वकील विरुद्ध पोलीस असा नवा वाद रंगला आहे.