गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी देश विदेशात कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे.अमेरिकीतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी तर्फे युनिव्हर्सिटी इनोव्हेशन फेलोज म्हणून अजय चंद्रपट्टण, संजना गोंबी,संजना बाळीगा यांची निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांनी तेथे शिकविण्याच्या पद्धतीवर आणि त्यातील सुधारणा या विषयावर आपला प्रकल्प सादर केला होता.जगभरातून अव्वल विद्यार्थ्यांना तेथे निमंत्रित करण्यात आले होते,अशी माहिती कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष उदय कालकुंद्रीकर आणि प्राचार्य आनंद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्मार्ट इंडिया हॅकथॉलॉन २०१८ स्पर्धेत देखील गोगटे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या संघांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांकाचे एकेक लाख रु.चे दोन पुरस्कार मिळवले.सलग छत्तीस तास न विश्रांती घेता विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले होते.
आय आय टी मुंबई तर्फे आयोजित यंत्र रोबोटिक्स २०१८ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विविध कार्य करणाऱ्या रोबोची प्रात्यक्षिके सादर केली.
विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन मंडळाने अभिनंदन केले.पत्रकार परिषदेला ए.डी. कुलकर्णी,संतोष सराफ,हरिष भेंडीगेरी आणि विद्यार्थी उपस्थित होते