Tuesday, November 19, 2024

/

ग्रामीणचा आमदार समितीचाच करण्याचा बैठकीत निर्धार, दहा एप्रिल पासून मागवले अर्ज

 belgaum

१२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी निवड समितीतून ग्रामीण मतदार संघासाठी कमिटीतून उमेदवार निवडून मध्यवर्ती कडे पाठवले जाणार आहे त्या नंतर जेष्ठ नेते एन डी पाटील आणि माजी अर्थ मंत्री जयंतराव पाटील हे निवड करतील असा महत्वपूर्ण ठराव तालुका समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.tauka mes 1

बैठकीच्या अध्यक्षस्थानी निन्गोजी हुद्दार होते. गेली दहा वर्ष ग्रामीण भागात आमदार नसल्याने काहीही करून समितीचा आमदार निवडून आणू असा निर्धार अनेक समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. उमेदवार कोणीही असो प्रत्येकाने मीच उमेदवार म्हणून कार्य करा असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीत केले. गेल्या दहा वर्षात समितीला आमदार नसल्याने मराठी माणूस पोरका झाला आहे त्यामुळे यावेळी काहीही करून मराठी भाषिक आमदार झालाच पाहिजे यासाठी सर्वजण काम करू असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केल.

अशी असेल निवड प्रक्रिया

तालुका समितीत देखील निवड प्रक्रिया दहा पासून सुरु होणार आहे . दहा एप्रिल ते १२ एप्रिल पर्यंत तालुका समितीच्या कार्यालयात दुपारी बारा ते सायंकाळी पाच च्या वेळेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले असून इच्छुका कडून एक लाख रुपये डीपाजीट म्हणून जमा करा तर इच्छुका कडून यातील पन्नास हजार संघटनेस देणगी म्हणून ध्यावे लागेल अशी देखील अट घालण्यात आली आहे.

प्रत्येक गाव गावातून एकेक सदस्य अशी निवड समिती नेमण्यात येणार असून मागील निवडणुकीत ५०० मते पडलेल्या गावात एक सदस्य पाचशे ते एक हजार पडलेल्या गावात दोन तर एक हजार ते १५०० मते पडलेल्या गावातून तीन आणि पंधराशे हून अधिक मते पडलेल्या गावातून चार जणांची निवड कमिटीत नियुक्ती करण्यात येणार आहे. निवड समितीत नियुक्ती करण्यासाठी ९ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत नावे कार्यालयात आणून द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. कमिटी किती जणांची नेमावी याबाबत  समिती निर्णय घेणार आहे.

पाच हजार जणांनी अर्ज दाखल करावेत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामीण मतदार संघात एकाला अधिकृत उमेदवार करून निवडून तर आणूया दुसरीकडे कमीत कमी पाच हजार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करून साऱ्या देशाचे लक्ष सीमा प्रश्नी वेधून घेऊन अशी भूमिका आर आय पाटील आणि भागोजी पाटील यांनी मांडली.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.