?मेष-हा सप्ताह आपणास काही बाबतीत शुभ फल दायी राहील.नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.सामाजिक कार्यात काम करणाऱ्या व्यक्तीना मानसन्मान मिळेल.विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल.कला व नाट्य क्षेत्रात करिअर करणाऱ्या किंवा त्यात काम करू इच्छिनाऱ्याना नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच या काळात तरुनतरुणीनि जपून वागावे एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होईल. किंवा प्रेमप्रकरणे अयशस्वी होतील.व्यावसायिकांना उत्तम काळ.महिलांना गृह सौख्य लाभेल.
वृषभ-हा सप्ताह आपणास मध्यम फल देणारा राहील. या काळात जमिनीचे व्यवहार फार जपून करावे.या काळात विनाकारण खर्च वाढतील.त्यामुळेया काळात खर्च जपून करावे.मित्रानं कडून आर्थिक सहकार्य लाभेल.जुनी येणी वसूल होतील.महिलांना या काळात कौटूंबिक जबाबदाऱ्या वाढतील.मुलांना सुट्टीचा आनंद मिळेल.वयस्कर लोकांनी या काळात पोटाची काळजी घ्यावी.
?मिथुन-या काळात विवाहिताना संतती प्राप्तीचे योग येतील.तसेच व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील.नोकरी व्यवसाय संबंधित केलेले प्रवास लाभ दायी होतील.परंतु याकाळात आपणाला वादविवाद पासून लांब राहणे योग्य राहील.विशेष करून नोकरीत असणाऱ्या व्यक्ती कारण त्यामुळे आपणास नोकरीत अडचणी निर्माण होतील.महिलांचे नवीन घराचे स्वप्नं पूर्ण होतील. या काळात मात्र तरुनतरुणींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
?कर्क-हा सप्ताह आपणास विशेष चांगला राहणार नाही या काळात आपण करत असलेले काम अर्धवट होईल. त्यामुळे निराश व्हाल.या काळात आर्थिक स्थिती बेताची राहील. कुणाशीही उदारीउसनवारी केली तर महागात पडेल.त्यामुळे कुठलाही पैशाचा व्यवहार जपून करावा.या काळात गुप्त शत्रू च्या कारवयात वाढ होईल.महिला व मुलां ना सहलीचा आनंद घेता येईल.उष्णतेचे त्रास होतील.
?सिंह-हा सप्ताह आपणास यश देणारा असा राहील. आपण घेतलेले निर्णय फल दायी होतील.नोकरिव्यवसायत असणाऱ्यांना काही आर्थिक लाभ होतील.नोकरीत बढती मिळेल.व्यवसायात काहीतरी नवीन उपक्रम सुरू कराल त्यात यश येईल.राजकारणात कार्य करणार्यांना शुभ काळ. महिलांना एखादया धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.घरात एखादे मंगलकार्य होईल.वयस्कर व्यक्तींनी गुडघ्याचे विकार जाणवतील.
?कन्या-या सप्ताहात आपणास एखाद्या कौटूंबिक मेजवणीचा आनंद घ्याल.तसेच पतिपत्नी मधील मतभेद असतील तर ते मिटतील.महिलांना कुटूंबिक सौख्यात वाढ होईल. घरात पाहुणे येतील.तसेच नोकरी व्यवसायात असणाऱ्यांना अचानक काही आर्थिक लाभ होतील.हॉटेल व्यावसायिकांना व्यवसायात वाढ करण्यास उत्तम काळ आहे.
?तुला-हा सप्ताह आपणास प्रगती कारक राहील काही गोष्टी वगळता इतर काही बाबतीत बारा राहील. यात विशेष करून या काळात आपण कुठल्यातरी कारणाने कोर्ट कचेरी च्या कचाट्यात सापडले जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी.अन्यथा एखादे प्रकरण अंगलट येईल.व्यवसायात कुठलीही प्रकारची भागीदारी अपयशी होऊ शकते.परंतु हा सप्ताहात आपण घरात एखादे मोठे धार्मिक विधी कराल व त्यातून आपणास मानसिक समाधान लाभेल.त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.विवाहयोग्य तरुण तरुणीचे विवाह जुळतील.विवाहिताना संतती प्राप्तीचे योग येतील.
?वृश्चिक-या सप्ताहात आपल्याला नोकरी व्यवसायानिमित्त परदेश गमनाचे योग येतील.आपण हाती घेतलेल्या कामात यश येईल.नवीन वास्तूचे स्वप्नं पूर्ण होतील. महिलांना मात्र या काळात मासिकपाळी चे आजार होतील किंवा या काळात गरोदर महिलांनी आपल्या तब्येतिची विशेष काळजी घ्यावि.तसेंच कोर्टकचेरीच्या कामातील अडथळे दूर होतील. मागील सप्ताहात अडकलेली कामे या सप्ताहात पूर्ण करू शकाल.मुलांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
?धनु-या सप्ताहात शेयरमार्केट संबंधित व्यवसायात असणार्या ना काळ चांगला राहील.तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व लोकांना लाभदायक सप्ताह आहे.या काळात मुलांकडून उत्कर्ष कारक बातमी मिळेल.परंतु या काळात बोलताना संयम बाळगावा.कुणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्यावी.महिलांना उत्तम काळ.
?मकर-या सप्ताहात आर्थिक बाबतीत काही शुभ कारक राहील.परंतु पैसे येतील त्याप्रमाणे खर्चही होतील.कामाची धा वपळ वाढेल.त्यामुळ शारिरीक त्रास होऊ शकतो.नोकरी व्यवसायात असणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास घडेल. काही आर्थीक अडचणी निर्माण होतील.या काळात महिलांनी घरातील वयस्कर मंडळी च्या तब्येतिची काळजी घ्यावी.नातेवाईक मित्र यात काही पूर्वी असलेले वाद मिटतील. मित्राचे सहकार्य लाभेल.नवीन वाहन खरेदीचे योग येतील.