आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तालुका समितीत एकीचे वारे वाहत असताना आज रविवारी दुपारी ओरिएंटल शाळेत होणाऱ्या तालुका समितीच्या सामान्य बैठकीत मराठी भाषिक युवा आघाडी देखील सहभागी होणार आहे.
मराठी भाषिक युवा आघाडीचे भाऊ गडकरी यांनी देखील कार्यकर्त्यांना हजर रहाण्याचे आवाहन केलं आहे.गडकरी म्हणाले की रविवारी दुपारी ठीक 2.00 वाजता ओरिएंटल स्कूल मध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मीटिंग आहे ,त्या मीटिंग ला आपण सर्वांनी हजर राहायचं आहे ,ते एकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे तेव्हा आमच्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मराठी भाषिक युवकांनी अगदी मनापासून हजर राहावे.
ते पुढे म्हणाले की आत्ता शेवटची वेळ आहे ही ,आत्ता जर आम्ही ह्याचा गांभीर्याने विचार नाही केलो तर समिती तळागाळाला जाईल आणि नंतर कपाळाला हात लावून काही होणार नाही.