बेळगाव शहर उत्तर दक्षिण विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जेष्ठ नेते एन डी पाटील,माजी मंत्री जयंतराव पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेच ठरवतील असा महत्वपूर्ण ठराव शहर समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी रंगुबाई पॅलेस येथे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. उत्तर दक्षिण मतदार संघासाठी आगामी 9 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत रंगुबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येथील शहर समितीतले अर्जं मध्यवर्ती कडे पाठवण्यात येतील आणि मग मध्यवर्ती मधून एन डी पाटलां कडे जयंत पाटील यांच्या कडे पाठवले जातील मग शरद पवार आणि एन डी पाटील यांच्या सुचनेतून उमेदवारांची अंतिम निवड होईल अस दीपक दळवी म्हणाले.
सायंकाळी पाच वाजता बैठकीस सुरुवात झाली यावेळी सुरुवातीलाच अनेक मुद्द्यावर वादळी चर्चा आणि बैठकीत मत मतांतरे झाली समितीच्या पाईकांनी एकी करा असे म्हणत समिती नेत्यांना धारेवर धरले. सर्व कार्यकर्ते एक असून नेत्यांना समज ध्यायला हवी असा सूर होता.
सामान्य पणाने राबणारा कार्यकर्ता आज मराठी साठी अंगावर केस घेतो तो समिती निष्ठ आहे पण उमेदवारीच्या काळात आणि निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येणारी नेते साडे चार वर्षे कुठं होते असा प्रश्न युवा कार्यकर्त्यांनी विचारला त्यावर दीपक दळवी यांनी कुणावर ही वयक्तिक टीका करू नये असे आवाहन केलं.
बैठकीला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर थांबले होते.संतप्त युवकांनी समिती नेत्यांत काय मतभेद आहेत ते जाहीर करा अशी मागणी केली त्याचा योग्य खुलासा दळवी यांनी केला नसल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.