शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दक्षिण आणि उत्तर मतदार संघासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया थांबवा अशी मागणी समितीच्या पाईकांनी केली आहे.
शहरात एकी झाल्याशिवाय अर्ज स्वीकारू नये कारण यामुळेच फुटीला चालना मिळेल कोणत्याही स्थितीत एकी झाली पाहिजे.गेले दोन महिने समितीचे युवा कार्यकर्ते एकीसाठी झटत असताना एका गटाकडून अर्ज मागवणारी प्रक्रिया सर्वसमावेशक नाही यामुळे ही प्रक्रिया गोंधळ माजवणारी ठरू शकते त्यामुळे तात्काळ अर्ज स्वीकारणा प्रक्रिया बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे, चंद्रकांत गुंडकल,श्रीधर जाधव यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.यावेळी मदन बामणे,सुनील बाळेकुंद्री,पियुष हावळ,श्रीकांत कदम,सूरज कणबरकर,सचिन केळवेकर,आशीर्वाद सावन्त, निखिल रायकर,राहुल हुलजी,रत्न प्रसाद पवार,राजू कदम आदी उपस्थित होते.
गुंडकल यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठांना पोचवू एकी व्हावी ही समस्त सीमा वासीयांच्या भावना आहे एकी दोन्ही बाजूनी प्रतिसाद दिल्यास होईल असं गुंडकल म्हणाले