एल सी ३८८ श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल शनिवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी सामान्य जनते साठी सुरु करण्यात आले आहे. हे ब्रिज वाहतुकीसाठी खुल करण्यात आल्याने उन्हात रहदारी त्रास घेणाऱ्या सामान्य बेळगावकर जनतेने काही प्रमाणात का होईना सुटकेचा निश्वास सोडला आहे.
२४ कोटी खर्चून केंद्र सरकारने तब्बल १४ महिने १२ दिवसात या ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे हे ब्रिज बंद असल्याने कपिलेश्वर ब्रिज वर रहदारीचा ताण पडत होता या ब्रिज वर आणि तानाजी गल्ली रेल्वे फाटकावर अनेकदा रहदारीच्या लांब च्या लांब रांका लागत होत्या. ओल्ड पी बी रोड चे ब्रिज सुरु झाल्याने शहापूर खासबाग वडगांव या भागातील लोकांना याचा उपयोग होणार आहे.
दोन दिवसापूर्वी पूर्ण झालेल्या ब्रिज वरून केवळ दुचाकी स्वार ये जाता करत होते आचार संहिता असल्याने ब्रिज सामान्य बेळगावकरांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी सिटीजन कौन्सिलने प्रादेशिक आयुक्त आणि पत्र लिहून पंत प्रधान आणि रेल्वे मंत्री सह अधिकाऱ्यांना देखील केली होती त्या नुसार हे ब्रिज शनिवारी सायंकाळी सर्व सामान्या साठी खुले करण्यात आले आहे.