निवडणुकीची आचारसंहिता सगळ्यांनाच अडसर ठरत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांबरोबरच सामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या लग्नसराईलाही या आचारसंहितेचे ग्रहण लागले असून लग्नाची वरात काढायची तरीही परवानगी घ्यावी लागत आहे.
गृह शांती, बारसे, नामकरण सोहळा आणि इतर घरगुती कार्यक्रमही आचारसंहितेच्या चक्रात अडकले आहेत, कार्यक्रम तयारीचा एक भाग परवानगी होऊन बसली आहे, यामुळे नागरिकांची त्रेधा उडू लागली आहे.
सध्या पोलीस स्थानक आणि निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय लग्न करणे आणि जन्मलेल्या बाळाला नाव ठेवणेही कठीण आहे, मात्र नियमानुसार ते करावे लागत आहे.
फक्त राजकीय कार्यक्रमांना परवानगीची सक्ती करावी आणि सामान्य माणसांना वगळावे अशी मागणी आहे पण राजकीय व्यक्तीही आशा कार्यक्रमांच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेतात म्हणून निवडणूक आयोग आशा सक्तीने अंमलबजावणी करत आहे.