जुन्या धारवाड रोड वरील एल सी क्र ३८८ असे शासकीय नाव असलेल्या आणि महानगरपालिकेच्या ठरवाप्रमाणे पुढे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे किरकोळ पेंटिंग काम वगळता सर्व काम पूर्ण झालं आहे.
बुधवारी सायंकाळी नव्याने बांधून पूर्ण झालेल्या ब्रिज वरून प्रवास करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.
२४ जानेवारी 2017 रोजी ४० फूट रुंद या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले होते. यास २४ कोटी खर्च करण्यात आले आहेत.रुपाली सिनेमा पर्यंत १० पिलर तर जिजामाता चौका पर्यंत ४ पिलर उभे करण्यात आले आहेत.१४ महिने १२ दिवसात हैद्राबाद च्या के पी आर कन्स्ट्रक्शन कंपनीने या ब्रिजचे काम पूर्ण केले आहे.
आचारसंहिता पूर्ण होईतोवर वाट बघू नका, हा पूल लवकरात लवकर नागरिकांना खुला करा अशी मागणी कालच बेळगाव सिटीझन फोरम या संघटनेने केली होती अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सामान्य माणसांना रहदारी साठी हा पूल सुरू करावा अशी मागणी होत आहे.
या पुलास छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल अस नामकरण करण्यासाठी बेळगाव महा पालिकेतील सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी प्रयत्न केले होते.सहा एप्रिल ला खासदार बेळगावला आल्यावर ब्रिज सुरू करण्यात येईल अशी माहिती ब्रिज वरील कर्मचारी देताना दिसत होते मात्र जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ ब्रिज सुरू करा अशी जनतेतून मागणी होत आहे.