बेळगाव शहरात दरवर्षी शिवजयंती अक्षय तृतीयेला उत्साहात साजरी होते. दरवर्षी तीन दिवसांचा हा सोहळा पुणे किंवा मुंबईपेक्षाही जोरदार होतो, पण यंदाची शिवजयंती निवडणुकीच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.
२७ मार्च रोजी निवडणूक आयोगाने कर्नाटक निवडणुकीची घोषणा केली आहे. यामुळे आचारसंहिता सुरू झाली आहे. आणि अक्षयतृतीया १८ एप्रिल ला आल्याने शिवजयंती ऐन आचार संहितेत आली आहे, यामुळे ती साजरी करण्यास परवानगी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१८ रोजी शिव प्रतिष्ठापना आणि पूजन व २० रोजी मिरवणूक याप्रमाणे ठरल्या जाणाऱ्या जयंती उत्सवाला परवानगी दिली जाणार की नाही याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाकडे परवानगी साठी गेल्यावरच नेमके काय ते स्पष्ट होऊ शकणार आहे.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने अजून तरी त्याची तयारी सुरू केली नाही, काही युवक कार्यकर्त्यांच्या मते यंदा शिवजयंती उत्सव पुढे ढकलून निवडणूक झाल्यावर तो साजरा करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने निवडणुकीतील उमेदवारांना आयती प्रचाराची संधी मिळू नये यासाठी कोणती निर्णय घेतला जातो हे स्पष्ट नाही.