बेळगाव सिटीझन कोन्सिल च्या सदस्यांनी प्रादेशिक आयुक्त मेघन्नावर यांची भेट घेऊन जुन्या धारवाड रोडवरील पूर्ण झालेला उड्डाणपूल लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी केली आहे.
सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, सेवंतीलाल शाह, विकास कलघटगी आणि अरुण कुलकर्णी यांचा समावेश होता.
सध्या शहरात रहदारी समस्या गंभीर आहे. ब्रिटिशकालीन ब्रिज बांधला जात आहे. लोकांना रेल्वे गेटवरच विसंबून रहावे लागत आहे. यासाठी हा ब्रिज पूर्ण झाला असून तो खुला करावा, आचारसंहिता असल्याने नंतर उदघाटन करावे अशी मागणी करण्यात आली.
मेघन्नावर यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देतो असे आश्वासन दिले .
जुना धारवाड रोड बंद असल्याने शहापूर वडगांव जुने बेळगाव हलगा भागातील हजारो वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यातच वाढत्या गर्मीत ट्रॅफिक जॅम मुळे बेळगावकरांची दैना उडाली आहे अश्यात आचार संहिते मुळे कुणालाही याचे श्रेय न जाता जनतेसाठी ब्रिज खुला करावा हव तर निवडणुकी नंतर ब्रिजचे औपचारिक उदघाटन करावं अशी देखील मागणी केली आहे.