बेळगाव दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप मधून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना जेडीएस ने मराठा आणि मराठी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्याची बातमी आहे. मूळचे काँग्रेस मध्ये अजूनही असलेले महेश कुगजी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजप आणि काँग्रेस हे पक्ष वारंवार कन्नड उमेदवार लादु लागले आहेत. उमेदवार निवडी वरून दोन्ही पक्षात बंडाळी सुरू आहे. याचा फायदा घेण्यासाठी कुमारस्वामी यांनी मराठा कार्ड वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी जेडीएस प्रणित तिसऱ्या आघाडीचे सरकार येणार आणि कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माल पडणार असे अनेक संस्थांच्या निवडणूक पूर्व अहवालात बाहेर आले आहे, यामुळे मराठी आणि कन्नड आशा दोन्ही भाषिक मतदारांमध्ये चालेल असा चेहरा शोधला जात आहे, यात कुगजी यांचे नाव सर्वात पुढे असल्याची चर्चा जेडीएस वर्तुळात आहे.
नुकतीच कुमारस्वामी यांनी महेश कुगजी यांची भेट घेतली असून काँग्रेस सोडून ते जेडीएस मध्ये प्रवेशाच्या मार्गावर आहेत. सोमवार दि ९ ला होणाऱ्या जेडीएस च्या मेळाव्यात ते अधिकृतपणे त्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
उद्योजक, चित्रपट वितरक आणि सामाजिक कार्यकर्ते ही ओळख आहे. राजीव गांधी ब्रिगेड चे जिल्हाप्रमुख, काँग्रेस चे शहर जनरल सेक्रेटरी, इंटक चे जिल्हा उपाध्यक्ष ही काँग्रेस मधील महत्वाची पदे सोडून ते जात असल्याने नक्कीच त्यांच्या दक्षिण मधील तिकिटावर शिक्कामोर्तब होणार हे माहीत असल्यानेच जात असल्याचा अंदाज आहे.