उमेदवार निवडीवरून खानापूर समितीत निर्माण झालेला वादंग शमण्याची चिन्हे आहेत. ३९ लोकांची समिती स्थापन करून उमेदवार निवडण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आज होणाऱ्या मध्यवर्तीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन व्हावी, त्या अंतर्गत निवड केली जावी असे ठरले असल्याची माहिती मिळाली आहे.
ज्येष्ठ मार्गदर्शक एन डी पाटील यांच्यासमोर दोन्ही गटांची बैठक घेऊन हा तोडगा काढण्यात आला आहे, यामुळे एकाच उमेदवाराची निवड होऊन समितीचा निश्चित विजय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.