मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत समितीने आपल्याला बोलावून उमेदवारी दिली होती, त्यावेळी आपला पराभव झाला होता, त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी भरणार नाही, अशी भूमिका माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी जाहीर केली आहे.
सध्या सगळेच आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सगळ्या मतदारसंघात प्रयत्न करत आहेत. समितीची एकी होणे गरजेचे आहे. अशावेळी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे असून आपण यामध्ये पुढाकार घेतला आहे.
एकदा उमेदवारी लढवलेल्या लोकांनी आपले घोडे दमटू नये याची वस्तुपाठ रेणू किल्लेकर यांनी घालून दिला असून बाकीच्यांनी आदर्श घेण्याची गरज आहे.
Trending Now