खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य विभागातील तळेवाडी, होर्डा, कृष्णपुर आणि मेंडील या गावांना आजपर्यंत गावात इलेक्टरीक दिवे बघून माहीत नव्हते.
आता या गावांमध्ये सुर्यऊर्जेमुळे दिवे प्राप्त झाले आहे.
रस्ते नाहीत, शाळा व हॉस्पिटल नाहीत, पावसात या गावचे रस्ते तीन ते पाच महिने बंदच असतात.आता आचारसंहितेच्या पूर्वी या गावांना सोलार प्रोजेक्टचे दिवे बसवण्यात आले आहेत.
सध्या प्रत्येक घराला दोन बल्ब ची सोय झाली आहे. आणखी वाढीव सुविधा मिळावी म्हणून गावकरी मागणी करत आहेत.