माजी आमदार अभय पाटील यांच्यावर भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी दाखल केलेल्या याचिकेत अँटी करप्शन ब्युरो पोलिसांनी ताबडतोबड आरोपपत्र दाखल करा अशी मागणी विविध संघटनांनी केली.
सोमवारी सकाळी ए सी बी चे डी सी पी अमरनाथ रेड्डी यांना भ्रष्टाचार निर्मुलन परिवार सह विविध संघटनांनी निवेदन सादर केलं.
सुजित मळगुंद यांनी माजी आमदारां विरोधात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून बेकायदेशीर संपत्ती जमविल्याचा आरोप करत लोकायुक्त कडे 2012 मध्ये याचिका दाखल केली आहे. त्यानंतर fir no 12/2017 मध्ये सुधारित याचिकेवर तात्काळ आरोपपत्र दाखल करून भ्रष्ट नेत्यांवर वेळेत कारवाई करा अशी देखील मागणी केली आहे.
भ्रष्ट नेते पुन्हा निवडणुकीत उभं राहण्याचे संकेत मिळत आहेत म्हणून आम्ही आगामी निवडणुकीच्या आत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सुजीत मूळगुंद, प्रमोदा हजारे,नारायण सावंत,सुनील जाधव, साजिद सय्यद,संतोष जंतीकट्टी आदी उपस्थित होते.
Trending Now