गेल्या अनेक दिवसांपासून लागून राहिलेली उत्सुकता अखेर सफल संपूर्ण. संपूर्ण सीमाभागाला ज्यांचे शब्द ऐकायचे होते असे माननीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांचे खणखणीत भाषण नुकतेच बेळगाव वासियांनी ऐकले . पवार साहेबांबद्धल लिहिण्याचा माझा प्रयत्न तसा हा हिमालयाची उंची खाली थांबून मोजण्यासारखी आहे याचे भान आहे मला . पण थोडं गरजेचा वाटल म्हणून लिहितोय शेवटी लेखणी हे एकमेव अस्त्र माझे.
थोड मागे जाऊन सुरवात करतो . २३ मार्च ला पवार साहेबांची मुंबईत भेट घेतली. आता हि भेट होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले याची जाणीव झाली पण त्याबद्धल कोणताही राग नाही मनात कारण बेळगावकर म्हंटल कि साहेबांच्या दारातून कुणालाही माघारी पाठवलं जात नाही . अगत्याने साहेब त्यांची भेट घेतात. हो पण कारण प्रबळ हवे. खरतर या भेटीचे अनेक जण अनेक बाजूनी विपर्यास लावत आहेत पण स्वतःच मन स्वच्छ असलं कि कशाचीही भीती वाटत नाही. तर मुळ मुद्दा कि त्यांची भेट यासाठी घेतली कि त्यांच्या बेळगाव भेटी दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नेत्यांमध्ये एकोपा घडावा. आणि खर सांगायचं तर आम्ही त्यांना काही विनवणी करण्यापेक्षा हिखुद्द पवार साहेबांची इच्छा आहे हेत्यांनी स्वतः हून सांगितलं. हेविशेष . त्यांनी या बद्धल सविस्तर सांगितलं आणि त्या अनुशंघाने त्यांनी इतरांशी चर्चा केल्याचे कळते.
आता एकी करा यासाठी त्यांची घेतलेली भेट, हे काही लोक गुन्हा ठरवून आपापल्या कार्यकर्त्यांची आमच्या विरोधात डोकी भडकावतील हे बेळगाव ला परत आल्यावर जाणवलं. असो पण त्यावरही काही राग मनात नाही. शेवटी नेता नेतो म्हणून कार्यकर्ता त्या विचारांनी जातो.
विषयांतर नको , महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी यावी आणि सीमा लढ्याच्या सोड्वूनुकीला चालना मिळावी यासाठी साहेबांची भेट महत्वपूर्ण ठरली आहे. एक अर्थाने संपूर्ण देशात आज हा विषय चर्चेला आलाय याच सगळ श्रेय शिवसेना खासदार संजय राउत आणि सर्वश्री पवार साहेब यांचे. देशपातळीवर काय परिणाम होणार यांची हे येणारा काळ सांगेल पण स्थानिक पातळीवर काय घडतंय यावर आज बोलू. एकंदरीत मध्यवर्तीच्या नावाखाली तमाम नेते एकाच व्यासपीठावर दिसले हे पाहिलं फलित. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी सीमावासीयांच्या पाठीशी खंबीर आहे हे दुसर फलित . उन्हाच्या तडाख्यात हजारो लोक जमले हे तिसर फलित. आणि कर्नाटकात राजकारणाचे वारे फिरले हे सगळ्यात जास्त महत्वाचे.
आता या वर वर दिसणाऱ्या गोष्टी पण पवार साहेब काही गोष्टी जाहीर बोलले नसले तरी त्यांच्या कृतीतून जर कुणी शिकत नसेल तर त्यांच्या सारखे दुर्दैवी तेच. भेटी दरम्यान त्यांनी दिलेली तरुणभारत कार्यालयाला भेट. व्यासपीठावर श्री किरण ठाकूर यांना सोबतच्या रांगेत बसण्याचा आग्रह आणि आपल्या भाषणात एकीचा दिलेला संदेश या महत्वपूर्ण आहेत.खरतर १९९३ नंतर दुरावलेले लोक एकत्र आले साहेबांनी कोणताही किंतु मनात न ठेवता दिलखुलास भेट घेतली हे आपल्या स्थानिक पातळीवर घडेल का ? यावरच विचारमंथन कराव लागेल. कारण जरइतके मोठे असून साहेबांनी जे सौजन्य एकत्र येवून लढ्यासाठी दाखवलं तेआपले स्थानिक नेते करतील काप्रश्न कायम आहे. हे करत असताना नुसत टाळ्या वाजवू नका जास्त आमदार विधानसभेत पाठवा जेणे करून दिल्लीत वजन टाकता येईल हे सांगायला ते विसरले नाही. त्यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख हा एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे यावरच होता . तसं त्यांनी आपल्या ट्विटर अकौंट वर ट्विट पण केले नंतर. यातून बोध नेत्यांनी तर घ्यावाच पण कार्यकर्त्यांनी पण घेतला पाहिजे. पण हे शीतयुद्ध संपायला हव होत ते झाल नाही याची खंतआहे मनात. जस साहेबांनी कोल्हापुरातील राजकरण एका प्रवाहात आणले तेच त्यांनी बेळगावात करायला हव होत असाच वाटतय. त्यांना भेटून बोलण्याचा प्रयत्न केला पण तेकाही शक्य झाल नाही. पण तरीही या सर्व घटनांमधून आपले लोक बोध घेतील एवढीच आशा. कारण पवार साहेब जरी बेळगाव मध्ये नसले तरी त्याचं बारीक लक्ष असत . त्यामुळे ते येवून गेलेत आता काहीकरायला मोकळ या संभ्रमात कुणी राहू नये. नाहीतर ९३ चा दोष एकाला लावला आता २०१८ चा दोष दुसर्याला लागू नये आणि यासगळ्यात सीमावासीयांची वाताहत होऊ नये हीच इच्छा.
पियुष हावळ